logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लाच प्रकरणातील पोलिस नाईक बडतर्फ




जळगाव : एक लाख रुपयांची लाच
घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेले शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विनोद पीतांबर अहिरे याला पोलिस प्रशासनातून बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी काढले आहेत. तसेच शनिपेठ पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कंट्रोल जमा करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकाने रंगेहाथ सोमवारी एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस नाईक विनोद अहिरे याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर संबंधित पोलिस नाईक याच्यावर पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती, अखेर १६ एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अहिरे याला बडतर्फ केले आहे.

22
989 views

Comment