धान खरेदीसाठी किसान सभेचे साखळी उपोषण सुरु
भाकप व आयटकचा सक्रिय पाठिंबा
धान खरेदीसाठी किसान सभेचे साखळी उपोषण सुरु
भाकप व आयटकचा सक्रिय पाठिंबा
विलास केजरकर भंडारा.
भंडारा : - धान खरेदी मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने १६ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला असून सक्रिय सहभाग सुद्धा घेण्यात आला आहे.
भंडारा जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते यांचे नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक चे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके, कॉम्रेड माणिकराव कुकडकर, जिल्हा कौन्सिल सदस्य कॉम्रेड भगवान मेश्राम, तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे, कॉम्रेड ताराचंद देशमुख, प्रभावित शेतकरी डुमदेव कहाळकर, पत्रकार समशेर खान इत्यादींची उपस्थिती होती.
नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे, केंद्र सरकार धान खरेदी करण्याची लिमिट वाढवून देत नसेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचा शेवटचा धानाचा दाना खरेदी होईपर्यंत आम्ही धान खरेदी करू असे वारंवार जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकारने धान खरेदीची लिमिट वाढवून खरेदी करावी या प्रमुख मागणी करिता नियोजनानुसार १६ एप्रिल २०२६ भंडारा, १७ एप्रिल पवनी, १८ एप्रिल भंडारा, १९ एप्रिल लाखनी व मोहाडी, २० एप्रिल लाखांदूर व मोहाडी, २१ एप्रिल साकोली, तर २२ एप्रिल तुमसर तालुके सहभागी होणार आहेत. तसेच तहसील स्तरावरही मोर्चे व निदर्शने करण्यात येणार आहेत. या सर्व आंदोलनात सुद्धा भाकप व आयटकच्या सक्रिय सहभाग राहणार आहे असे आवाहन कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015