रिकबचंद एस. पाटील यांना राज्यस्तरीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 प्रदान
वर्धा (महाराष्ट्र): अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अमरावती यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात रिकबचंद एस. पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार समारंभ दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कांचन रिसोर्ट, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवसारी चौक, अमरावती येथे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. माधुरी सचिन चव्हाण व सचिव श्री. सचिन चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ. सुलभाताई संजयजी खोडके, सौ. वनिता किसनराव इंगळे (संचालिका, ओम शांती दिव्यांग वसतीगृह, अमरावती), डॉ. दिलीप एस. काळे, डॉ. गौतम एस. मोरे, डॉ. सारिका दिनेश शायरी, डॉ. शंकर अदानी (सीए, अहिल्यानगर), डॉ. वैभव निमकर आणि उद्योजिका व साहित्यिक कांचन उल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा अरुण डगवार यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी रिकबचंद एस. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.
रिकबचंद एस. पाटील हे यशवंत नगर, हिंगणघाट (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील वसतिगृह अधिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर मिळून एकूण 7 पुरस्कार प्राप्त केले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल ऑल इंडिया बंजारा टायगर्स, अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पूर्व संघटना (महाराष्ट्र राज्य), महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना, ज्ञानज्योत बहुउद्देशीय संस्था बोरगाव तसेच सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, वरोरा यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.