logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Engilsh Medium School : इंग्रजी माध्यमाच्या दहा शाळा अनधिकृत; प्रशासन अधिकाऱ्यांना ‘समज’ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास पाल्याचे शैक्षणिक नुकसान;

Engilsh Medium School : इंग्रजी माध्यमाच्या दहा शाळा अनधिकृत; प्रशासन अधिकाऱ्यांना ‘समज’
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास पाल्याचे शैक्षणिक नुकसान; पालकच राहणार जबाबदार पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सरकारची परवानगी न घेता दहा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. शाळा बंद करण्याबाबत नोटिसा दिल्यानंतरही शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी या शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेऊ नये,’ असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.नागरिकांनी पाल्यांचा प्रवेश अनधिकृत शाळांमध्ये करू नये. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर व भविष्यातील शैक्षणिक मान्यतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश दिल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संबंधित पालक स्वतः जबाबदार राहतील. संबंधित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी सरकारची परवानगी प्राप्त केल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत.

अनधिकृतपणे शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयांनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. चऱ्होलीतील तीन, कासारवाडीत दोन, मोशी, ताथवडे, चिंचवडेनगर, वाकड आणि काळेवाडीतील प्रत्येकी एका अशा दहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृत आहेत.प्रशासन अधिकाऱ्यांना समज
खासगी शाळांना मान्यता, शाळांचे नवीन वर्ग चालू करणे, शाळेच्या इमारती ताब्यात घेण्याचे काम विभागप्रमुख, अतिरिक्त आयुक्तांची मान्यता न घेता केले जात असल्याचा ठपका ठेवून शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांना समज देण्यात आली आहे. यापुढे खासगी शाळांना मान्यता देण्यासह सर्व विषयांसाठी प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीचे प्रस्ताव विभागप्रमुख, अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविण्याचे आदेश उपायुक्त ममता शिंदे यांनी बांगर यांना दिले आहेत.

0
46 views

Comment