logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*“ताटलीच्या अंधश्रद्धेत गुदमरलेलं भविष्य की पुस्तकाच्या जोरावर उभा राहणारा स्वाभिमानी समाज? – आरक्षण* , *वर्गीकरण आणि अस्तित्वाचा* *निर्णायक हिशेब!”*

🙏 *जय भीम,जय शिवराय,जय लहुजी* , *जय आदिवासी* 🙏


*“ताटलीच्या अंधश्रद्धेत गुदमरलेलं भविष्य की पुस्तकाच्या जोरावर उभा राहणारा स्वाभिमानी समाज? – आरक्षण* , *वर्गीकरण आणि अस्तित्वाचा* *निर्णायक हिशेब!”*

✍️ *लेखक - पॅंथर, पत्रकार चंद्रकांत जगधने*

*मी* आज माझ्या मातंग समाजाशी सरळ, स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलतोय—कारण आता वेळ निघून चालली आहे आणि आपण अजूनही स्वतःलाच फसवत बसलोय! एकीकडे आपण आरक्षणातील वर्गीकरणासाठी लढतोय, रस्त्यावर उतरतोय, न्यायाची भाषा करतोय; पण दुसरीकडे आपण आपल्या घरात अंधश्रद्धेचं विष पेरतोय आणि आपल्या लेकरांच्या भवितव्याचा गळा स्वतःच घोटतोय—ही कडू पण निर्विवाद सत्य आहे! आजही आपल्या समाजात भीती, भोंदूगिरी, चुकीच्या परंपरा आणि अंधश्रद्धा इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की आपण आपल्या मुलांना विचार करायला शिकवत नाही, तर घाबरायला शिकवतो; प्रश्न विचारायला शिकवत नाही, तर मान झुकवायला शिकवतो—आणि अशा मुलांकडून आपण उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करतो, हीच आपली सर्वात मोठी चूक आहे!
आरक्षण ही भीक नाही—तो हक्क आहे; पण त्या हक्काचा उपयोग करण्यासाठी शिक्षणाची, विचारांची आणि धाडसाची गरज असते, आणि जर आपल्या लेकरांच्या डोक्यावर अजूनही “ताटलीचं ओझं” असेल, तर ते पुस्तक उचलणार कसं, स्पर्धा करणार कसं, पुढे जाणार कसं? म्हणूनच वर्गीकरण ही गरज आहे—कारण अजूनही मातंग समाजापर्यंत संधी समानपणे पोहोचलेल्या नाहीत, आणि हा अन्याय संपवण्यासाठी वर्गीकरण आवश्यक आहे; पण इथेच एक मोठं सत्य आपण नजरेआड करतोय—फक्त वर्गीकरण मिळालं म्हणून सगळं बदलणार नाही, जोपर्यंत आपण अंधश्रद्धेच्या बेड्या तोडत नाही!

*याच ठिकाणी मी, पॅंथर, पत्रकार चंद्रकांत* *जगधने, माझ्या समाजाला थेट आणि कडक शब्दात सांगतो—जो समाज आपल्या लेकरांच्या* *हातात पुस्तकाऐवजी* *अंधश्रद्धा देतो, तो स्वतःच्या भविष्याचा खून करतो; आरक्षण* *आपल्याला दरवाजा उघडून देईल, पण त्या दरवाजातून आत जाण्याची ताकद फक्त* *शिक्षण आणि जागरूक* *विचार देतात!*

म्हणूनच आता दोन लढाया एकत्र लढाव्या लागतील—एक आरक्षणातील वर्गीकरणासाठी आणि दुसरी अंधश्रद्धेविरुद्ध; कारण एकाशिवाय दुसरी अपूर्ण आहे! जर आपण आजही ताटली, भीती आणि खोट्या परंपरांमध्ये अडकून राहिलो, तर उद्या आपल्या लेकरांच्या हातात काहीच उरणार नाही—ना संधी, ना आत्मविश्वास, ना भविष्य! पण जर आपण आज ठरवलं, की ताटली बाजूला ठेवायची आणि पुस्तक हातात द्यायचं, अंधश्रद्धेला नाकारायचं आणि शिक्षणाला स्वीकारायचं—तर कोणतीही ताकद आपल्याला थांबवू शकणार नाही!
आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे—गप्प बसून स्वतःचा नाश पाहायचा की उभं राहून आपल्या पिढ्यांचं भविष्य घडवायचं; कारण इतिहास साक्षी आहे—जो समाज स्वतः बदलतो, तोच पुढे जातो, आणि जो अंधश्रद्धेत अडकतो, तो कायम मागेच राहतो!

*मी* *, पॅंथर पत्रकार चंद्रकांत जगधने, माझ्या* *समाजाला शेवटचं आवाहन करतो—आरक्षणासाठी लढा, पण अंधश्रद्धेविरुद्ध बंड करा; ताटली* *नव्हे, पुस्तक उचला; भीती नव्हे, विचार जगा—कारण शिक्षणाशिवाय* *आरक्षण अपूर्ण आहे आणि जागृतीशिवाय समाजाचं* *भविष्य नाही!*

✍️ *लेखक - पॅंथर, पत्रकार चंद्रकांत जगधने*
*मो.7823089822*
[16/04, 6:20 pm] devashishtokekar05: *Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
67 views

Comment