logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

  महाराष्ट्र -शासन.चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने. धोत्रा भनगोजी (जि.प. शाळा) येथे १७, एप्रिल रोजी समाधान शिबिराचे आयोजन!!

मन्सूर शहा धोत्रा भंनगोजी चिखली.:--- संपूर्ण महाराष्ट्रभरात (एप्रिल २०२६) महसूल विभागामार्फत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे' आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांत सातबारा दुरुस्ती, वारसा नोंदी, नाव दुरुस्ती आणि प्रलंबित फेरफार यांसारख्या जमीन नोंदणीशी संबंधित समस्यांचे जागेवरच निवारण केले जात आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
समाधान शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये:
उद्देश: महसूल प्रशासन गतिमान व लोकाभिमुख करणे आणि तक्रारींचे जागेवर निराकरण करणे .
समाविष्ट सेवा: वारस नोंद, सातबारावरील नाव दुरुस्ती, फेरफार नोंदी व इतर जमीनविषयक प्रश्न.
स्थान व वेळ: मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन. (धोत्रा भंनगोजी येथे १७ एप्रिल, रोजी आयोजित, करण्यात येत आहे.)
लाभ: शेतकऱ्यांना कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होत आहे .
नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित महसूलविषयक तक्रारी मार्गी लावाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने
नागरिकांच्या विविध समस्या एकाच छताखाली सोडविण्यासाठी विशेष समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
शिबिराचे दिनांक व ठिकाणः
१७ एप्रिल धोत्रा भनगोजी (जि.प. शाळा). आहे.
उपलब्ध सेवाःफेरफार मंजुरी,प्रधानमंत्री आवास योजना,आधार नोंदणी व अपडेट,उत्पन्न / जात / निवासी दाखले,मतदान कार्ड सेवा,रेशन कार्ड / eKYC,शेतकरी योजना (AgriStack, Farmer ID)
आरोग्य योजना (आयुष्मान भारत, महात्मा फुले योजना),DBT योजना लाभ. तसेच
विशेष लाभःशेतकऱ्यांसाठी यंत्रसामग्री सुविधा
रस्ते व सिंचन योजनांचा लाभ,सरकारी योजनांची तत्काळ अंमलबजावणी,सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा ! असे आव्हान तहसीलदार साहेब चिखली यांनी केली आहे.!!

24
4795 views

Comment