logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वर्धा -सिंधी (रेल्वे ):-निर्भीड पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न, सिंधी रेल्वे पोलिसांकडून पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल.....

वर्धा -सिंधी (रेल्वे )::- सिंधी रेल्वे पोलीस स्टेशन चे ठाणेदार नरेंद्र निस्वादे आणि हेड कॉन्स्ट्रेबल धनराज सयाम यांच्या कार्यकाळातील कथित गैरप्रकारबाबत "दैनिक हिंदू जागर "ने सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या बातम्या थांबवण्यासाठी रोशन ठाकूर यांना विविध प्रकारची आमिष दाखवण्यात आली होती, मात्र कोणत्याही आमिष्याला बळी न पडता त्यांनी आपली लेखणी निर्भीडपने सुरूच ठेवली, मॅनेज न झाल्याचा राग मनात धरूनच हा खोटा गुन्हा दाखल केल्याची चर्चा आता जोर धरत आहे. पोलिसांचा थेट पत्रकाराच्या घरी दबाव एवढ्यावरच न थांबता ठाणेदार नरेंद्र निस्वादे स्वतः 3ते 4पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन रोशन ठाकूर यांच्या घरी पोहचले होते, सुदैवाने रोशन ठाकूर यावेळी कामानिमित्य बाहेरगावी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, मात्र अश्या प्रकारे फौंज फाटा पत्रकाराच्या घरी पाठवणे हा केवळ दबाव टाकण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ""ही लेखणी विकत नाही,"ही लेखणी वाकत नाही,"या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतांना रोशन ठाकूर यांनी ठणकावून सांगितले कि "सत्य मांडल्याची ही किंमत असेल तर ती चुकवायला आम्ही तयार आहो ", ही लेखणी सत्यासाठी लढते आणि या पुढही जनतेचा आवाज बनून निर्भीड पणे उभी राहणार आहे. एका बाजूला शासन पत्रकारांच्या संरक्षणाचे कायदे करते, तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन अश्या प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकाराची उच्चंस्तरीय चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी आता जनतेमद्धे होऊ लागली आहे......

21
1256 views

Comment