logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गाडगे महाराज मराठा परीट धर्मशाळा ट्रस्ट आळंदीच्या अध्यक्षपदी संतोष भालेकर यांची बिनविरोध निवड

गाडगे महाराज मराठा परीट धर्मशाळा ट्रस्ट आळंदीच्या अध्यक्षपदी संतोष भालेकर यांची बिनविरोध निवड

कार्याध्यक्षपदी सुनील शिंदे, सचिवपदी सुधीर पाटोळेसह सर्वांची बिनविरोध वर्णी

विलास केजरकर भंडारा

भंडारा :- श्री डेबूजी उर्फ गोधडे महाराज उर्फ गाडगे महाराज मराठा परीट धर्मशाळा ट्रस्ट आळंदी (पुणे) येथे आज मंगळवार दि. १४ एप्रिल ला नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कारप्राप्त संतोष भालेकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या सुरवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गायिका आशा भोसले आणि समजातील मृत व्यक्तीना सामूहिक स्वरुपात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नवनिर्वाचीत विश्वस्तामधून पदाधिकाऱ्यांची नेमणूक सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षपदी संतोष दत्तात्रय भालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दिलीप शिंदे, बन्सी पारडे आणि कल्पना गायकवाड, कार्याध्यक्षपदी सुनील शिंदे, सचिवपदी सुधीर पाटोळे, सहसचिवपदी सतीश राऊत तर खजिनदारपदी संजय भागवत व सहखजिनदार श्रीपाद कदम यांची बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत अध्यक्ष संतोष भालेकर यांनी सर्वांचे आभार मानले व येणाऱ्या काळात धर्मशाळेच्या विस्तार व सुखसुविधेसाठी सर्वानी खांद्याला खांदा लाऊन एकजुटीने काम करू असे आश्वासन अध्यक्ष संतोष भालेकर यांनी दिले.
संत गाडगेबाबा परिट समाज संस्था जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष सुभाष कदम, माजी अध्यक्ष दीपक कदम, मा. अध्यक्ष आबा महाडिक, सल्लागार संतोष कदम, हसमुख पांगारकर, श्रीकृष्ण शिंदे, दादा जांभुळकर, सावित्री होमकळस, कार्याध्यक्ष मनोज शिंदे, सचिव नवनीत भोसले, उपाध्यक्ष वसंत पिंपळकर, सुयोग घाग, खजिनदार राजू भोसले, लॉंड्री अध्यक्ष महेश भोसले, सचिव रितेश महाडिक, युवा अध्यक्ष नितीन चाळके, कार्याध्यक्ष संदेश कदम, महिलाध्यक्षा अंजली पिंपळकर, कार्याध्यक्षा वैशाली शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
36 views

Comment