डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा आणि समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा आणि समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.
प्रतिनिधी/आकाश गेडाम, पोंभुर्णा,
दि.१४ एप्रिल.
मानवमुक्तीचे महानायक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पोंभुर्णा येथील शिवाजी चौकात सामाजिक समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. आदिवासी टायगर सेना पोंभुर्णा व दैनिक नवराष्ट्र निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसाला भात वितरण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या मनोगतात त्यांनी, “डॉ. आंबेडकरांचे विचार हे समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त सेवा आणि समतेचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन आहे,” असे सांगत समाजाने एकजुटीने प्रगती साधावी, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून दशरथ कुळमेथे विदर्भ संघटक, ड्रेफुल आत्राम जिल्हा अध्यक्ष, विश्वेश्वर मडावी जिल्हा महासचिव, हेराज सिडाम जिल्हा संघटक, महेश श्रीगिरीवार ता. पत्रकार देशोन्नती, विनोद चांदेकर शिवसेना विधानसभा प्रमुख म्हणून उपस्थित होते.
दैनिक नवराष्ट्र निर्माणचे मुख्य संपादक डी. एस. ख्वाजा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश मेश्राम यांनी प्रभावी शैलीत केले, तर प्रास्ताविक सचिन मडावी यांनी सादर करून उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर आभार किशोर माहोरकर यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मसाला भात वितरणाद्वारे गरजू व सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमातून समता, बंधुता आणि सेवाभाव यांचा संदेश देत डॉ. आंबेडकरांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल मेश्राम, खजेंद्र सेमले आदिवासी टायगर सेना पदाधिकारी तसेच दैनिक नवराष्ट्र निर्माण परिवारातील सदस्य यांनी सुद्धा परिश्रम घेतले.