logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भामरागड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

भामरागड ता.१४- तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळाचे वतीने विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी भामरागडच्या मुख्य चौकातून रॅली काढून घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष लीलाधर कसारे हे होते. विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहीते हे होते.प्रमुख पाहुणे लोकबिरादरी आश्रम शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम झोडे, भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य सज्जू पठाण, सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई ईष्टाम,आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल,प्रतिष्ठित नागरिक बाबुरावजी पिपरे,जेष्ठ पत्रकार रमेश मारगोनवार, प्रतिष्ठित नागरिक दशरथ मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तद्नंतर त्रीशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहीते म्हणाले,” डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जास्तीत जास्त वेळ वाचनात घालवत.वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात व लेखनाची आवड निर्माण होते.म्हणून तरूणांनो वाचनाची आवड लावा. त्यासाठी पुस्तकांना मित्र वनवा व ग्रंथालयात अधिका-अधिक वेळ घालवा. “ असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना व तरुणांना मोहीते यांनी दिला,तद्वतच ज्ञान प्रसारक मंडळाने वाचनालय उघडून विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी निर्माण करावी असा सल्ला दिला.
सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत भामरागडचे मुख्य रस्त्यांवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात घोषणा देत रॅली काढण्यात आली.पोलीस स्टेशन भामरागड तर्फे पोलीस चौकात रॅलीत सहभागींना शरबत देण्यात आले. तर मुख्य बाजारपेठेत कंत्राटदार तपेश हलदार यांच्यातर्फे शरबत देण्यात आले.रात्री ९ वाजता भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर मुरमाडे यांनी केले. संचालन तारका टेंभुर्णे-ओंडरे यांनी तर उपस्थितांचे आभार चतुर सर यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुतांश लोक उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुनिल ओंडरे, अनुप मोडक, आत्माराम वैद्य,तेजस्वीनी ढवळे,गणेश्री इटकेलवार,नगराळे मॅडम,कोल्हेसाहेब,किशोर कांबळे, जगताप, लोणारे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

25
1379 views

Comment