खंडणीप्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
अकोला : जिल्ह्यातील स्टोन क्रशर
उद्योजकांकडे खंडणी व लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद राहुल गायकवाड 'यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यास १५ हजार रुपये दिल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये केला असून तक्रारीसोबत संभाषणांच्या काही ऑडिओ क्लिप्सही पोलिसांकडे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय व औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्व आरोपांचे अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी खंडन केले आहे.