logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महेंद्र मेंढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती निमित्त मार्गदर्शन

अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महेंद्र मेंढे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती निमित्त मार्गदर्शन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- विश्वातील शेतकरी, शेत मजूर, दलित, शोषित-पिढीत व नौकरी महिला वर्ग, दिन दुबळ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय संविधान बहाल करून सर्वांना न्याय देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे यांनी केले.
ते महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन भंडाराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर सेवक शिवशंकर आजबले, उपाध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, सुरज साखरकर, आसिफ भाई, शेखर भाईके, जयदेव माहुर्ले, संजय वंजारी, विनोद चकोले, आसिफ भाई, विनोद आस्वले, सुरज गायधने, आकाश कटणकर, नागेश ताईतकर, जितेंद्र ढेंगे, लोकेश गाढवे, सुदेश साखरकर, प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी - कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
त्यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, भारतीय संविधान अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होते.
उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चारित्र्यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतुल मेंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धिरज भोपे, जिवन भेदे, देशकर, मंगेश गिरेपुंजे, अनिरुद्ध कुंभलकर, जितेंद्र ढेंगे, संदीप दोनुले, शेखर फंदे, ज्ञानेश्वर सोलंकी, निखिल केवट, विनोद सार्वे, सुरेश कटणकर, गोलू गाढवे, राहुल घडिले, अक्षय ईळपाचे, अनुराधा मेश्राम, पिंकी शेलारे, कांचन खोब्रागडे, धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

14
708 views

Comment