logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नंदगोपाल फाउंडेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नंदगोपाल फाउंडेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- नंदगोपाल फाउंडेशन भंडारा च्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ कार्यकर्ते सुंदरलाल मेघवानी, नेत्र चिकित्सक डॉ. आशा लांजेवार, पर्यावरण प्रेमी विलास केजरकर, भोजराज गौतम, समीर नवाज, हेमराज ठाकरे सचिन भोयर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील विविध मार्मिक प्रसंगावर उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ कार्यकर्ते रविशंकर साकोरे व प्रास्ताविक सरीन भोयर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ओमप्रकाश लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनोद साठवणे, दिनेश हरडे, शंकरलाल मेघवानी, रुद्र गौतम, सौरभ गौतम, सरिता गौतम, गितेश्वरी गौतम, शोभना सरोजकार, कशिश मेघवानी, ममता मेघवानी, आरोही चौधरी, तनिया मेघवानी व रिद्धी मेघवानी नंदगोपाल फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

28
2010 views

Comment