भिवापूर येथे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपन्न.
भिवापूर येथे रमाई मित्रमंडळ भिवापूर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा मंच तसेच सर्व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, विश्वरत्न प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती चा कार्यक्रम आज दि 14 एप्रिल 2026 ला संपन्न झाला. सतत तीन दिवसांपासून एकल तथा समूह नृत्य स्पर्धा,बाबा का जागले?बाबा का रडले? बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सुदंर नाटक,सुगम संगीत भिमगीताचा कार्यक्रम अश्या अनेक विध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चा कार्यक्रमाला भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भिवापूर च्या प्रागंणात करून सर्वाना भोजन दान देवून कार्यक्रम संपन्न झाला