नाशिक शहरातील दत्तनगर मधील आनंद वाटिका सोसायटी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
नाशिक शहरातील दत्तनगर मधील आनंद वाटिका सोसायटीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. रात्री बरोबर 12 वाजता आनंद वाटिका सोसायटी मधील नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन करत जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि नागरिकांनी एकत्र येत या जयंतीला भव्य स्वरूप दिले.