logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे रेल्वे स्थानकात आम्ही पदार्थाचा मोठा साठा जप्त

शहापूर 7साजिद शेख
ठाणे रेल्वे स्थानकातील दोन बेवारस बॅगेत अमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. या स्थानकातून एकूण १० फलाट असून उपनगरीय रेल्वे गाड्या आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची वाहतुक सर्वाधिक होते. त्यामुळे लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असतात. त्यामुळे स्थानकात दिवस-रात्र पोलिसांची गस्ती असते. लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून या स्थानकात पाहणी केली जाते.स्थानकातील फलाट क्रमांक सात आणि आठवर सोमवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला दोन बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी फलाटावरील प्रवाशांना विचारले असता बॅगेचे वारस आढळून आले नाही. बेवारस बॅग सापडल्याने सुरुवातीला घातपाताचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे पथकाने बॅग उघडली. त्यावेळी बॅगेमध्ये गांजा या अमली पदार्थाचा साठा आढळून आला. फलाटावर गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांनी दोन्ही बॅग फलाट क्रमांक दोन येथील पोलीस चौकीत आणल्या.
पथकाने गांजा या अमली पदार्थाचे वजन केल्यानंतर ८ किलो २४० ग्रॅम वजनाचा १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे प्रदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम २० (ब) आणि ८ (क) नुसार गुन्हा दाखल झाला.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गेल्याकाही वर्षांमध्ये गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी ठाणे नगर पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले होते. रेल्वे रुळ परिसरातही गर्दुल्ले बसलेले असतात. रात्रीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भिक्षेकरू किंवा नेशेच्या आहारी असलेल्या तरुणांचा वावर असतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. महिला आणि बालकांना या भिक्षेकरू आणि नेशेखोरांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नशेबाजांवर कठोर कारवाईची मागणी प्रवाशांकडून केली जाते. आता रेल्वे स्थानकात गांजा या अमली पदार्थांचा साठा सापडल्याने रेल्वे मार्गे हा अमली पदार्थ शहरांमध्ये दाखल होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

4
13 views

Comment