गोहत्येला पूर्णविराम;SP सोमनाथ घार्गे यांचा स्वामी त्रिवेद्रानंद यांच्या हस्ते सन्मान...
गोहत्येला पूर्णविराम;SP सोमनाथ घार्गे यांचा स्वामी त्रिवेद्रानंद यांच्या हस्ते सन्मान...
नगर (शिवप्रहार न्यूज/प्रतिनिध):-क्षेत्रफळाने विशाल असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशाचे रक्षण करण्यासाठी व गोहत्या पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने राबवलेली मोहीम कौतुकास्पद ठरत आहे.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत श्री १००८ महामंडलेश्वर,स्वामी त्रिवेद्रानंद सरस्वतीजी महाराज (श्रीक्षेत्र ईंदू वासिनी गड,पिंपळनेर) यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांचा विशेष सत्कार केला.
"अहिल्यानगरचा पॅटर्न' संपूर्ण राज्यासाठी आदर्श"
सत्कार प्रसंगी बोलताना स्वामी भावूक झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले.स्वामीजी म्हणाले की, "राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी, त्याची खऱ्या अर्थाने कडक अंमलबजावणी अहिल्यानगर जिल्ह्यात सोमनाथ घार्गे यांनी करून दाखवली आहे.आज आम्हाला बाहेर कुठेही गेल्यावर अभिमानाने अहिल्यानगरचे उदाहरण द्यावे लागते.अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आज छ.संभाजीनगर सारख्या इतर शहरांनाही आहे."
यावेळी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज ईलग,ह.भ.प. रामेश्वर महाराज आव्हाड,तुकाराम विघ्ने,मल्हारी विघ्ने उपस्थित होते.एलसीबीचे (LCB) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या कार्याचाही गौरव याप्रसंगी करण्यात आला.पोलीस दलाने केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील गो-प्रेमी,धार्मिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015