मोटारसायकल चोरणारी श्रीरामपूरची टोळी पकडली; १२ गाड्या जप्त...
मोटारसायकल चोरणारी श्रीरामपूरची टोळी पकडली; १२ गाड्या जप्त...
श्रीरामपूर/पाथर्डी (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) या बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी दत्तात्रय भागवत म्हस्के वय २८ वर्षे रा. रेणुकईवाडी ता. पाथर्डी यांची दिनांक ०८/०३/२०२६ रोजी तिसगावरोडवर रेणुकाईवाडी येथे लावलेली मोटार सायकल नंबर एम.एच.१६.सी.एल.१३६५
हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु. र. नं. ३४७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी पो. नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांनी आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / हरिष भोये, पोसई/संदिप मुरकुटे, व पोलीस अंमलदार दिपक घाटकर, सुरेश माळी, अतुल लोटके, विष्णु भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा अत्तार, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, योगेश कर्डीले, प्रकाश मांडगे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन,सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
हे पथक मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींची माहिती काढत असताना नमुद गुन्ह्यातील मोटार सायकल रेकॉर्डवरील आरोपी नामे महेश कांदळकर,रा.अशोकनगर ता.श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारांसह मिळुन चोरी केली असुन ते मोटार सायकल विक्री करण्यासाठी श्रीरामपुर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथक अशोनगर परिसरात रेल्वे पुलाखाली सापळा लावुन थांबले असता दोन मोटार सायकलावर चार इसम नावे १) महेश कांदळकर वय-२४ वर्षे रा. जाधववस्ती, अशोकनगर, ता. श्रीरामपुर, २) अजय कांदळकर वय- २२ वर्षे रा. जाधववस्ती, अशोकनगर, ता. श्रीरामपुर, ३) जावेद बेग,वय १८ वर्षे रा.अशोकनगर निपाणी वडगाव रोड, ता. श्रीरामपुर, ४) विकास जाधव वय-१९ वर्षे रा. जाधववस्ती, अशोकनगर ता. श्रीरामपुर असे ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना मिळुन आलेल्या दोन मोटार सायकलबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचे दोन्ही मोटार सायकली चोरीच्या असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपीकडे विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करत त्यांनी मढी यात्रेतुन ता. पाथर्जी, देहरे टोल नाका, कौठे कमळेश्वर ता. संगमनेर ठिकाणावरुन आणखी १० मोटार सायकल चोरी केल्याच सांगितले.आरोपींकडुन तब्बल ३,२९,०००/- रूपये किं.च्या १२ मोटार सायकली, ३४,०००/-रु कि.चे ५ वेगवेगळे कंपनीचे मोबाईल व पक्कड असा एकुण ३,५३,१००/- रु किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015