खमारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
खमारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- सिध्दार्थ बौद्ध विहार समिती व समस्त ग्रामवासी खमारी (बुटी) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त प्रबोधनावर दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम व संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य किशोर ठवकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी खमारी ग्राम पंचायत सरपंच नलिनी काळे होत्या. प्रमुख पाहुणे जिल्हा दुग्ध संघाचे संचालक हितेश सेलोकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभु फेंडर, विलास केजरकर, माजी उपसरपंच राजू मोटघरे, जिल्हा परिषद सदस्य रजनिश बन्सोड, ग्राम पंचायत सदस्य गिरधारी मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विक्की मेश्राम, हेमंत सेलोकर, ग्राम पंचायत सदस्या मंगला मडामे, जयश्री समरीत, ग्राम पंचायत सदस्या सौ. मंगला मडामे, लताताई समरीत, दिपमाला फेंडर, मेघा शनवारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सिध्दार्थ बौद्ध विहार खमारी बुटी येथे शांतीचे भगवान तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचशीला ग्रहन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील विविध मार्मिक प्रसंगावर उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून कसे तारले यावर नागरिकांचे प्रबोधन व्हावे म्हणून कव्वाल विनोद इंगळे नागपूर व महिला कव्वाल लाजेश्री नंदागवळी जळगाव यांच्यात दुय्यम कव्वालीचा शानदार कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. त्यावेळी रात्री १२ वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त लहान बालिका कु. आरूल बन्सोड, कबीर बन्सोड, संबोधी बन्सोड, यांच्या हस्ते केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीव सोमकांत मडामे व प्रास्ताविक अध्यक्ष अजय बन्सोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार विलास केजरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र बन्सोड, विलास कोटांगले, अमिराज डोंगरे, प्रतिक मेश्राम, डॉ. यशवंत मडामे, पंकज मडामे, निखिल साखरे, प्रदीप नंदागवळी, प्रदीप मेश्राम, योगेश भोयर, निलेश बन्सोड, प्रितम भोतमांगे, घनश्याम नंदागवळी, कोटांगले, साखरे, मडामे, मेश्राम, बन्सोड, भालाधरे, डोंगरे इत्यादी ग्रामवासी तसेच सिद्धार्थ बौद्ध विहार समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015