logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थित लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

*शिरूर ताजबंद येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सहकार मंत्र्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न.*
( बालाजी पडोळे -लातूर - महाराष्ट्र )
शिरूर ताजबंद येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपा ने धुपाणे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करत महामानवाला अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, पंचायत समिती सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, भाजपा तालुका उपाध्यक्ष बालाजी पडोळे, ग्राम पंचायत बांधकाम सभापती युवराज पाटील, मंत्री यांचे स्विय सहाय्यक कोंडीबा पडोळे, धनंजय जाधव, गंगाधर ताडमे,प्रशांत पाटील, खाजामियाँ किनिवाले,भाजपा शिरूर मंडळ अध्यक्ष प्रताप पाटील, ग्रामपंचायत सदस्य किसन कापसे, रामेश्वर येनुरे, किशोर वाघमारे, संभाजी सरवदे, शिवसेना नेते अनिल लामतुरे, पोलीस पाटील उत्तमराव वाघमारे, माजी व्हाईस चेअरमन गोविंद कापसे, नामदेव विराळे, महेश बिलापट्टे, शिवाद भोसले, सिद्धेश्वर औरादे, रामप्रसाद जाजू, भीमाशंकर येनुरे, सतीश कांबळे, मुख्यध्यापक दिपक भराटे, मुख्याध्यापक बबलू शेख, , सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक सरवदे, शंकर वाघमारे, बालाजी वाघमारे, माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम भोसले, राहुल वाघमारे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकी सरवदे, उपाध्यक्ष नागेश सरवदे, सचिव धर्मपाल सरवदे, सहसचिव मारोती सरवदे, स्वागताध्यक्ष माधव सरवदे, बळीराम मोरे, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव श्रीमंगले, धर्मपाल सरवदे यांच्यासह भीम अनुयायी, बौद्ध उपासक - उपासिका मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
ह्यावेळी रमामाता महिला मंडळाच्या वतीने *पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पहाय अजून भीम जिवंत हाय अजून भीम जिवंत आहे* हे गीत गाऊन उपस्थित विद्यार्थ्यांना संदेश देत अभिवादन केले.

127
6851 views

Comment