स्वयंदीप बुद्ध विहार गणेश कॉलनी गोकुलनगर, गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
गडचिरोली :-स्वयंदीप महिला मंडळ गणेश कॉलनी तर्फे स्वयंदीप बुद्ध विहार गोकुलनगर गडचिरोली येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.त्या निमित्याने नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्यांचे व SSC बोर्ड परीक्षेत प्रावीन्य प्राप्त विध्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना हर्षदा सुनील गोंगले हिने आपले विचार मांडले. विचारमंचावर उपस्थित मान्यवरानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.महाराष्ट्र शासनाच्या घर-घर संविधान ह्या उपक्रमातर्गत कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक अनुयायाला "संविधानाची उद्देशीका "भेट देण्यात आली.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.अपर्णा खेवले मॅडम ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. माधुरीताई मडावी मॅडम सामाजिक कार्यकर्त्या गडचिरोली , मा. संघमित्रा मोरे मॅडम STI गडचिरोली, मा. रामनाथ खोब्रागडे सर सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हे होते. तसेच मा. मेघाताई वरगंटीवार मॅडम नगरसेविका नगरपरिषद गडचिरोली मा. रवि भाऊ मेश्राम नगरसेवक नगरपरिषद गडचिरोली मा.अंजुमताई सय्यद मॅडम नगरसेविका गडचिरोली मा.मज्जीद भाऊ सय्यद सामाजिक कार्यकर्ते, मा.सलमान भाऊ खान सामाजिक कारकर्ते गडचिरोली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्वयंदीप महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमांची रूपरेषा ठरवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.कार्यक्रमाला बहुसंख्येने बौध्द उपासक, उपासिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. मा.चौधरी मॅडम यांनी केले तर प्रभावी सूत्रसंचालन आयु. शुभांगी उंदीरवाडे मॅडम यांनी केले.तसेच उपस्थित सगळ्यांचे आभार मानून आयु. दुर्गे मॅडम यांनी कार्यक्रमांची सांगता केली.