* डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी *
*साकोली/भंडारा (प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन, साकोली येथे दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
*कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.*
*कार्यक्रमाचे संचालन सोनिया टेंभुर्णे यांनी प्रभावीपणे केले. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सुश्रुत सहारे, समीराज बन्सोड आणि डिंपल लांजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली.*
*प्राध्यापिका शैला धनजोडे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अक्षय पुस्तोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचे महत्त्व पटवून देत समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.*
*कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच सर्व सहकारी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष मस्के यांनी केले.*
*अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.*