महाबळेश्वर परिसरातील रस्त्याची पाहणी; फॉरेस्ट विभागाची प्रत्यक्ष भेट छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य
परिसरातील रस्त्याची पाहणी; फॉरेस्ट विभागाची प्रत्यक्ष भेट छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य
महाबळेश्वर तालुक्यातील खिलार मुरा ते सह्याद्री नगर या रस्त्याच्या कामाबाबत फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली. संबंधित रस्त्याच्या स्थितीची तपासणी करून कामाची सद्यस्थिती, गुणवत्ता आणि पुढील कामाचा आढावा घेण्यात आला.
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्यामुळे विभागाने ही पाहणी केली असल्याचे समजते. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरवस्था, अपूर्ण कामे आणि नागरिकांना होत असलेला त्रास याची नोंद घेतली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी या पाहणीमुळे कामाला गती मिळेल आणि रस्त्याची स्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.