logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

झारगडवाडी ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाजभूषण वि. दा. ऐवळे यांची जयंती उत्साहात साजरी


झारगडवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच समाजभूषण वि. दा. ऐवळे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वि. दा. ऐवळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांना अभिवादन केले. यावेळी सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देण्यात आली, तसेच समाजभूषण वि. दा. ऐवळे यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी तालुका पोलिस स्टेशनचे शिंदे साहेब व त्यांचे सहकारी विशेष उपस्थित होते. तसेच ग्रामविकास अधिकारी विशाल घुले, माजी सरपंच पद्मनाभ निकम, पोलिस पाटील बोरकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल करे, हनुमंत झारगड, अनिल माने, आदित्य आवटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचे व समाजात समानता, बंधुता व न्याय या तत्त्वांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. तसेच वि. दा. ऐवळे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा व एकजुटीचा संदेश दिला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

4
2047 views

Comment