logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धोत्रा भंनगोजी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी! तरुणांनी जिल्हा परिषद शाळेला संविधान भेट देऊन जयंती साजरी केली.

मन्सूर शहा धोत्रा भंनगोजी प्रतिनिधी.:---आज धोत्रा . भनगोजी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगळी वेगळी जयंती साजरी करण्यात आली असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; 'नाचून नाही, वाचून' साजरी होणार भीमजयंती. अशी तरुण बौद्ध समाजाची तरुणांनी संकल्पना करून शाळेला संविधान भेट दिली आहे, तसेच वाचनालयात बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पुस्तके ही भेट देण्यात आली असून, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खाऊ वाटप तसे पेन व पुस्तक वाटप तरुण मंडळीच वतीने करण्यात आली आहे! असा उपक्रम राबवत असताना बौद्ध समाजातील तरुण मंडळीची चे कौतुक होत आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी देशभरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यंदा 'नाचून नाही, वाचून' आणि 'वाचून साजरी करणार जयंती' असा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
जयंतीनिमित्त अभिवादन, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षिका, व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकत अनेकांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर याबद्दल माहिती सांगितली आहे:, धोत्रा भंनगोजी गावात, सकाळी अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व महामानवाला अभिवादन करून अभिवादन सोहळे पार पडले आहे.
उत्साहपूर्ण वातावरण:
सामाजिक एकता: डॉ. आंबेडकरांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाची आठवण करून देत, सामाजिक समतेचा संकल्प करण्यात आला .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून, समतामूलक समाज घडवण्याचा संकल्प या जयंतीनिमित्त करण्यात आला आहे . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख उपस्थितीत, सरपंच धोत्रा भनगोजी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व शिक्षिका, अंगणवाडी सेविका व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी व ,पत्रकार बांधव, समाजसेवक, बौद्ध समाजातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण मंडळी, माता-भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, गावातील सर्व मान्यवर व्यक्ती. उपस्थित होते.!!

7
1094 views

Comment