मौजे कास गावामध्ये गटर लाईनचे काम गेल्या तीन महिन्यांपूर्वी ग्रुप ग्रामपंचायत अंधारी/कास यांच्या मार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत हे काम
मौजे कास गावामध्ये गटर लाईनचे काम गेल्या तीन महिन्यांपूर्वी ग्रुप ग्रामपंचायत अंधारी/कास यांच्या मार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत हे काम अपूर्ण अवस्थेतच पडून असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, या कामाचा ठेकेदार हा स्वतः सरपंच असल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काम रखडल्यामुळे स्वच्छतेचे प्रश्न गंभीर बनले असून दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
“आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?” असा सवाल गावकरी करत असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
तसेच, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर योग्य कारवाई करावी, अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.