logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद केंद्र शाळा नेर व उर्दू शाळा नेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम साजरा..

ता. धुळे — जि. प. केंद्र शाळा नेर व उर्दू शाळा नेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व अभिवादनाने करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांमधून शिक्षणाचे महत्त्व, समता व सामाजिक न्याय यांचे संदेश देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

20
2322 views

Comment