नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योगांसाठी प्रयत्न करा !
मेळाव्यात सूर : समाजाचा होणार उद्योजक मेळावा
जळगाव : अखिल भारतीय बारी समाज
महासंघातर्फे जून महिन्यात जळगावात घेण्यात येत असलेला उद्योजक मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी प्रयत्न करून शासन दरबारी आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश घोलप यांनी सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी शहरातील एका मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.
यावेळी उद्योग आघाडी प्रमुख यशवंत बारी, शेंदुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत खलसे, जिल्हाध्यक्ष अतुल बारी, महिला आघाडी प्रमुख लता बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रमेश घोलप यांनी विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील बारी समाजबांधव हा गरीब आणि कष्टकरी आहे. संत रुपलाल महाराज विकास महामंडळाच्या माध्यमातून शासनाने समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायातून आपली प्रगती साधावी, असे आवाहन केले.
मेळाव्यासंदर्भात समाजबांधवांनी अपेक्षा व्यक्त केल्या. होते. सूत्रसंचालन भरत बारी यांनी केले. रुपेश येऊल, भरत बारी, श्रीकांत बारी यांच्यासह यावल, पहूर, पारोळा, शेंदुर्णी या गावातील पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित