प्रशांत महासागरात ‘एल निनो’च्या सक्रियतेचा फटका; यंदा कमी पाऊस
हवामान बदलाचा सामना करणार्या नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रशांत महासागरात ‘एल निनो’च्या सक्रियतेचा फटका; यंदा कमी पाऊस
हवामान बदलाचा सामना करणार्या नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.मुंबई : पश्चिम आशियातील युद्धझळांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यात आता पावसाच्या अंदाजाने भर घातली. या वर्षी प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हवामान बदलाचा सामना करणार्या नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या हंगामात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. यात राज्यात यंदा सरासरीहून कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हवामान विभाग एप्रिलच्या मध्यात मोसमी पावसाचा पहिला अंदाज आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुधारित अंदाज जाहीर करतो.
अंदाजानुसार, देशात यंदाच्या मान्सूनच्या हंगामात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या वर्षीच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ६६ टक्के इतकी आहे.अकोल्यात सर्वाधिक तापमान
विदर्भातील कमाल तापमानात वेगाने वाढ होत आहे. अकोल्यात देशातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची सोमवारी नोंद झाली. अकोल्यासह विदर्भातील चार शहरांत तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. अमरावती आणि यवतमाळ येथे ४३.२ तर वर्धा येथे ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी झाली.
आर्थिक संकटाची वर्दी
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे, २०२६-२७ या आर्थिक वर्षात देशातील विकास दर वाढीला खीळ बसण्याची शक्यता ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केली. या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था ६.८ टक्के ते ७.२ टक्क्यांदरम्यान वाढेल, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र त्यात पुरेसा पाऊस झाला नाही तर महागाई वाढण्याचा धोका आहे.