logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जयंतीच्या पूर्वसंध्येला जीआर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चुकवले नाव; लक्षात येताच बदलला शासन निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समि

जयंतीच्या पूर्वसंध्येला जीआर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चुकवले नाव; लक्षात येताच बदलला शासन निर्णय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुनर्गठनावेळी राज्य सरकारच्या जीआरमध्ये बाबासाहेबांचे नाव तीन ठिकाणी चुकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाश समिती पुनर्गठित करण्यात आल्याचा राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात (जीआर ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तीन ठिकाणी चुकीचे होते. काही वेळाने चूक लक्षात आली आणि घाईने शासन निर्णय बदलण्यात आला. विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या सहीने हा शासन निर्णय जारी केला होता.जीआर मधील बाबासाहेबांचे नाव चुकवल्याबद्दल शासनावर आंबेडकरी चळवळीतून जोरदार टीका होत आहे. संविधान कर्त्याचे शासन नाव चुकीचे लिहिते आहे, याच्या एवढा कृतघ्नपणा दुसरा नाही, अशी टीका समाज माध्यमावर होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या २१ सदस्यांमध्ये अभ्यासक, संशोधक, विचारवंतापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सामाजिक समरसता मंचच्या कार्यकर्त्यांचा भरण अधिक करण्यात आलेला आहे.bसमितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असून उपाध्यक्ष या विभागाचे मंत्री इंद्रनील नाईक आहेत.नागपुरचे समरसता साहित्य परिषदेचे कार्यकर्ते डॉ. ईश्वर नंदपुरे, छत्रपती संभाजीनगरचे समरसता मंच कार्यकर्ते डॉ. रमेश पांडव, समरसता मंचचे संयोजक राहिलेले पुण्याचे डॉ. सुधाकर बाेकेफोडे तसेच समरसता मंचचे पदाधिकारी राहिलेले डॉ. सुनिल भडंगे यांची समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील असल्याने समितीमध्ये पुण्यातील कार्यकर्त्यांना झुकते माप दिलेले दिसते.दलित इंडियन चेंबर्स ऑफ काँमर्सच्या समन्वयक सीमा मिलींद कांबळे, आठवले गटाचे ‘रिपाइं’ कार्यकर्ते प्रा. विजय मोरे, नागपूरचे आंबेडकरी अभ्यासक प्रदीप आगलावे, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. ऋषीकेश कांबळे, योगिता होके- पाटील, सागर शिंदे यांनाही समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.क्षितीज गायकवाड, रमेश रावळकर, एकनाथ जावीर, संजय साळवे, श्यामकांत अत्रे यांना समितीवर सदस्य म्हणून संधी दिली आहे. सीमा मिलिंद कांबळे यांची मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीवर नियुक्ती लावली आहे. सीमा कांबळे या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक वर्षे पूर्णवेळ कार्यकर्त्या होत्या.

समिती काय करते ?

१९७६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती काम करत असून आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि भाषणांचे २३ खंड, जनता पाक्षिकाचे १० खंड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र साधन साहित्याचे २ खंड समितीने प्रसिद्ध केले आहेत. तसेच अनेक खंडांचे संपादन करून पुनर्मुद्रण केले आहे.

8
244 views

Comment