पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टाॅवर्स, दांडेकर पूल, विश्रां
पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टाॅवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक वळविण्यात येणार आहे. गर्दी ओसरेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात वाहतूक बदल करण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.सबस्क्राईब करा
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक बदल
‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक बदल (लोकसत्ता टिम)
पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब
‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक वळविण्यात येणार आहे. गर्दी ओसरेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात वाहतूक बदल करण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
हेही वाचा
चितळे बंधू मिठाईवालेंची गोड बातमी! आता मिठाई बनविताना प्रत्यक्ष पाहा अन् चवही चाखा…
पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेसमार्गे इच्छितस्थळी जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिका, वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.लष्कर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, शास्त्री रस्ता परिसरात वाहतूक बदल
बाजीराव रस्ता, लाल महाल चौकातील गणेश रस्ता, नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या भागातून सायंकाळी मिरवणूका जातात. त्यामुळे या भागातील गर्दी विचारात घेऊन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहने लावण्यासाठी व्यवस्था
या भागात येणाऱ्या अनुयायांनी त्यांची वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून काॅलनी येथे लावावीत.
दांडेकर पूल, विश्रांतवाडी परिसरात वाहतूक बदल
दांडेकर पूल परिसरातील वाहतूकबदल करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सारसबाग, कल्पना हाॅटेल, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, जुना दत्तवाडी रस्ता, आशा हाॅटेल चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आशा हाॅटेल चौकमार्गे दत्तवाडीत यावे. तेथून इच्छितस्थळी जावे. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आळंदी रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. आळंदी, दिघी, धानोरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.