logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

05 आरोपींकडुन 200 किलो गोमांस जप्त...

05 आरोपींकडुन 200 किलो गोमांस जप्त...

शेवगाव (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ दिपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, किशोर शिरसाठ, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, भाग्यश्री भिटे चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन सदर पथकास शेवगाव शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 12/04/2026 रोजी शेवगाव शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत शेवगांव शहरातील ईदगाह मैदन शेजारी इसम नामे मुनावर अब्बास कुरेशी हा त्याचे साथीदारासह गोवंशीय जनावरांचे कत्तल करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकुन 05 इसमांना ताब्यात घेवुन नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) मुनावर अब्बास कुरेशी वय-48 वर्षे रा. इदगाह मैदान शेजारी शेवगांव, 2) अदनान मन्सुर कुरेशी वय-23 वर्षे रा. सम्राट अशोकनगर शेवगाव, 3) जावेद अहमद शेख वय-35 वर्षे रा. नायकवाडी मोहल्ला शेवगाव, 4) जाकीर मोहम्मद शेख वय-40 वर्षे रा. इदगाह मैदान शेजारी शेवगाव, 5) जावेद फकीर मोहम्मद शेख वय-42 वर्षे रा. इदगाह मैदान शेजारी शेवगाव असे असल्याचे सांगितले.आरोपींच्या ताब्यातुन 40,000/- रुपये किंमतीचे 200 किलो गोमांस, 5000/-रु कि.ची एक गोवंशीय जनावर, 1000/-रु कि.चा एक वजनकाटा, 2500/-रु कि.चा 02 चाकु, 01 सुरा, 01 कु-हाड, 01 टोचा, 20,000/-रु कि.चे दोन मोबाईल असा एकुण 68,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीविरुध्द शेवगाव पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(क), 9, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment