logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व माजी विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न


दि १३ एप्रिल -पिंपळगाव सराई - जनता विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा माजी विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाने केले होते.

प्रतिमा व संविधान पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये पर्यवेक्षक संजय पिवटे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. रमेश जगताप यांची मंच्यावर उपस्थिती होती.

कार्यक्रमात नुकतेच पोलीस दलात निवड झालेले गजानन लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. गजानन लोखंडे यांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
आंबेडकर चळवळीचे समर्थक भगवानराव गायकवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला. भागवानराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

प्रा. रमेश जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी भाषण, गितगायन, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन आणि सूत्रसंचालन देविदास दळवी यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. अनुष्का गवते हिने केले.

फलक लेखन रवींद्र खांनंदे यांनी छायाचित्रण दिलीप शिंगणे यांनी केले. विद्यालयच्या सर्व घटकांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आभार मानले.

7
156 views

Comment