logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेतकऱ्याची कन्या झाली न्यायाधीश; पहिल्याच प्रयत्नात यश

लेहा.भोकरदन तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या आरती ज्ञानेश्वर सोनवणे हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर न्यायाधीश पद मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे आरतीने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले असून तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या आरतीने शिक्षणाच्या बळावर मोठे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करून दाखवले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही तिने हार न मानता सातत्याने अभ्यास केला. तिच्या या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, मार्गदर्शन आणि तिची प्रचंड मेहनत कारणीभूत ठरली.
आरतीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे. "मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही," हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
तिच्या निवडीबद्दल गावकऱ्यांकडून, नातेवाईकांकडून तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0
143 views

Comment