उरूळी देवाची बायपास रोड लगत अनधिकृत वाहन पार्किंग.
दि १३ हवेली (प्रतिनिधी-अंबादास गोरे)
उरुळी देवाची येथील कात्रज बायपास रस्त्यावरील सरकारी गायरान जागेवर गाड्या,क्रेन,अवजड वाहने इ अनाधिकृत पणे उभी करुन अतिक्रमण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या नंतर ग्रामस्थांनी सदर जागेवर जाऊन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
मा.सरपंच श्री.तात्यासाहेब भाडळे पाटील, मा.सरपंच उल्हासशेठ शेवाळे,मा.सरपंच लक्ष्मण नेवसे,सामाजिक कार्यकर्ते अमित भाडळे पाटील, सतिश देवकर, सागर तात्या भाडळे, सनी भाडळे, कुमार बोरकर इत्यादी तलाठी कार्यालयास देखील तक्रार दाखल केली आहे.