logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांविषयीचे विचार आणि आजची वास्तवता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांविषयीचे विचार आणि आजची वास्तवता

५ मे १९३० रोजी नेपाळमधील काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शासन यंत्रणेचा ताबा घेणे हे प्रत्येक कामगारांचे अंतिम ध्येय असले पाहिजे.” तसेच त्यांनी हेही प्रतिपादन केले की, या जगाला कार्ल मार्क्सपेक्षा तथागत गौतम बुद्धांचे विचार अधिक आवश्यक आहेत.

डॉ. आंबेडकर यांच्या मते, समता, बंधुता आणि न्याय यांची बीजे बुद्धांनीच पेरली होती. त्यामुळे कार्ल मार्क्स यांनी मांडलेले अनेक विचार हे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आणि पूर्वीपासून अस्तित्वात असलेले आहेत. म्हणूनच कामगारांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे अत्यावश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रज सरकारने भारतात कामगार मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या काळात त्यांनी कामगारांच्या हितासाठी अनेक कायदे आणि हक्क निर्माण केले. त्यांनी कामगारांना केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक न्यायही मिळवून दिला.

मात्र, आजच्या परिस्थितीकडे पाहिले असता, गेल्या ८० वर्षांत मोठे बदल झालेले दिसतात. संघटित आणि असंघटित कामगारांनी निवडून दिलेले अनेक लोकप्रतिनिधी भांडवलशाही विचारसरणीकडे झुकलेले दिसतात. त्यामुळे कामगार चळवळी कमकुवत झाल्या असून, कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

२००१ नंतर आणि विशेषतः २००४ पासून भारतात आणि महाराष्ट्रात खाजगीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला. सरकारी यंत्रणा हळूहळू खाजगी क्षेत्राकडे वळू लागली. उदाहरण म्हणून दूरसंचार विभागाकडे पाहता येईल. या विभागातील सरकारी नोकरीची भरती थांबली असून, खाजगी कंपन्यांचा प्रभाव वाढला आहे. यामुळे सरकारी महसूल कमी होऊन तो खाजगी क्षेत्राकडे वळत आहे.

आज शिक्षण, आरोग्य आणि प्रवास यांसारख्या मूलभूत गरजाही सामान्य नागरिकांना विकत घ्याव्या लागत आहेत. परिणामी, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी प्रचंड वाढली आहे. भांडवलशाही धोरणांमुळे देशातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असल्याचे चित्र दिसून येते.

कामगार चळवळी मोडीत काढण्यासाठी झुंडशाही, दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर होत असल्याचेही दिसते. “सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता” हे आजचे राजकीय धोरण बनले आहे. ही परिस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श भारताच्या संकल्पनेला विरोधी आहे.

आज आवश्यक आहे ती जागरूकतेची आणि योग्य निवडीची. कामगारांनी स्वतःला दोष न देता, कामगारांच्या हितासाठी काम करणारे, प्रामाणिक आणि लोकशाही मार्गाने काम करणारे लोकप्रतिनिधी निवडले पाहिजेत. राजकारणात झुंडशाही, हुकूमशाही आणि ठोकशाही नको, तर लोकशाही मूल्यांचा आदर हवा.

देशाप्रती प्रेम, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने काम केल्यास भारत नक्कीच जागतिक महासत्ता होऊ शकतो. अन्यथा, सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढत राहील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, या महान कामगार नेत्याला त्रिवार अभिवादन!

क्रांतिकारी कडक निळा जयभीम!


---

✍️ प्रा. लहुदास जनार्दन रोडे
परळी तालुका अध्यक्ष
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
89 views

Comment