logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पीएचडी मार्गदर्शकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या पीएचडी मार्गदर्शकाला अटक करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.पिंपरी : वनस्पतीशा

पीएचडी मार्गदर्शकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
पीएचडी मार्गदर्शकाला अटक करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.पिंपरी : वनस्पतीशास्त्रात पीएचडी करणाऱ्या तरुणीने ‘पीएचडी’साठी मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाकडून (गाईड) होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना चिंचवड येथे शनिवारी घडली. पीएचडी मार्गदर्शकाला अटक करण्यात आली असून, पोलीस या


पीएचडी मार्गदर्शकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
पीएचडी मार्गदर्शकाला अटक करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

पीएचडी मार्गदर्शकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या (प्रातिनिधीक छायाचित्र)
पिंपरी : वनस्पतीशास्त्रात पीएचडी करणाऱ्या तरुणीने ‘पीएचडी’साठी मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाकडून (गाईड) होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना चिंचवड येथे शनिवारी घडली. पीएचडी मार्गदर्शकाला अटक करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनींच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीएचडी मार्गदर्शकाला अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांनी माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले, की मृत तरुणीने ‘बॉटनी’ या विषयात एमएससी केले होते. ती पीएचडी करीत होती. आरोपी तिचा मार्गदर्शक होता. ऑगस्ट २०२५ पासून मार्गदर्शक तिला अनैतिक मार्गांनी, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता. शनिवारी सकाळी तरुणीचे कुटुंबीय बाहेर गेले होते. ती खोलीमध्ये असताना उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना बोलविले. दरवाजा उघडल्यानंतर तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये पीएचडी मार्गदर्शकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे तिने नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘पुन्हा अशी चूक करणार नाही’
पोलिसांनी सांगितले, की ‘पीएचडी मार्गदर्शकाने तीन दिवसांपूर्वी स्टॅम्प पेपरवर पुन्हा अशी चूक करणार नाही, असे लिहून दिले होते. परंतु, तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नाही. त्यामुळे चिठ्ठी लिहून तिने राहत्या घरी गळफास घेतला.’ पोलिसांनी आरोपी पीएचडी मार्गदर्शकाला अटक केली असून, पिंपरी न्यायालयाने आरोपीला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास घडली.

विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (१९, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी), जुबेर नासीर शेख (३०) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद नंदकुमार बहुले (३०, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी संगणमत केले. पहाटेच्या वेळी आरोपींनी प्रसादला गाठून “तुला जिवंत सोडत नाही” असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एकाच्या हातावरही आरोपी जुबेरने कोयत्याने वार केला. उर्वरित दोन आरोपींनी शौचालयाच्‍या तुटलेल्‍या पट्‌टीने आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्‍यानंतर आरोपींनी परिसरात हत्यारे फिरवून “आम्ही येथील भाई आहोत” अशी ओरडाओरड करत दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

1
25 views

Comment