US Blockade Iran Ports News: अमेरिकेचा इराणवर समुद्री वेढा, आजपासून पूर्णपणे नाकेबंदी; चर्चा निष्फळ ठरल्याने ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
US Blockade
US Blockade Iran Ports News: अमेरिकेचा इराणवर समुद्री वेढा, आजपासून पूर्णपणे नाकेबंदी; चर्चा निष्फळ ठरल्याने ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
US Blockade Iran Ports update: अमेरिकेने इराणच्या सर्व बंदरांना वेढा घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इराणसोबत सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, आजपासून इराणच्या समुद्री वाहतुकीवर अमेरिकेने पूर्णपणे बंदी घातली आहे.इस्लामाबाद येथे झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर आता अमेरिकेने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आजपासून इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरुवात होणार असल्याचं युएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) म्हटलं आहे. इराणची बंदरे, किनारी भागात प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांविरोधात ही नाकेबंदी असेल असंही सेंटकॉमकडून स्पष्ट करण्यात आलंय.
एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये यूएस सेंट्रल कमांडने म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनुसार त्यांचे सैन्य १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीची नाकेबंदी करण्यास सुरुवात करेल. ही नाकेबंदी इराणच्या बंदरांमध्ये आणि किनारी भागात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांविरुद्ध निःपक्षपातीपणे लागू केली जाईल. यामध्ये अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांचा समावेश आहे. मात्र, जे जहाजे इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाण्यासाठी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’चा (Strait of Hormuz) वापर करत आहेत, त्यांच्या नौकानयन स्वातंत्र्यात (Freedom of Navigation) सेंटकॉमचे सैन्य कोणताही अडथळा आणणार नाही.नाकेबंदी सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक नाविकांना औपचारिक सूचनेद्वारे अधिक माहिती दिली जाईल. सर्व नाविकांना असा सल्ला देण्यात येतो की, त्यांनी ‘नोटीस टू मरीनर्स’ प्रक्षेपणांचे निरीक्षण करावे आणि ओमानचे आखात तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये वावरताना ‘ब्रिज-टू-ब्रिज चॅनेल १६’ वर अमेरिकन नौदलाशी संपर्क साधावा”, असं आवाहनही सेंटकॉमकडून करण्यात आलं आहे.