बारी समाजाची आज बैठक
जळगाव : अखिल भारतीय बारी महासंघ जिल्हा जळगावच्या वतीने आगामी 'आर्थिक मेळाव्याच्या' नियोजनासंदर्भात सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता खोटे नगर परिसरातील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश घोलप यांची उपस्थिती लाभणार आहे. बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.