कळंब ( शिवप्रसाद बियाणी ) येथे व्येंकटरमना गोविंदा च्या गजरात बालाजी देवस्थान कळंबच्या वतीने वार्षिक ब्रह्मोत्सव निमित्ताने शहरात शोभायात्रा काढली.
कळंब ( शिवप्रसाद बियाणी ) येथे व्येंकटरमना गोविंदा च्या गजरात बालाजी देवस्थान कळंबच्या वतीने वार्षिक ब्रह्मोत्सव निमित्ताने शहरात पारंपारिक वाद्य वादका सहित भव्य अशी शोभायात्रा काढून महाप्रसादाने या ब्रह्मोत्सवाची सांगता मोठ्या हर्ष उल्लासात करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कळंब येथे बालाजी मंदिर देवस्थान व बालाजी भक्त गण यांच्या वतीने व्यंकट रमणा बालाजी भगवान च्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात असुन हा ब्रह्मोत्सव 9 एप्रिल पासून सुरू झाला यात विश्वकेसंन पूजन, देवी देवतांचे अभिषेक तीर्थप्रसाद, ध्वजारोहण, गरुड खांब पुजन, कल्याण उत्सव, रथपूजन, होम हवन, स्वास्तीवाचन, पुष्प याग, चक्र स्थान, विष्णू पारायण, श्री पूर्ण यज्ञ आहुती, असे अनेक धार्मिक विधीपूर्वक सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले. या चार दिवस चालणाऱ्या धार्मिक ब्रह्मोत्सव विधीपुर्वुक पार पाडण्यासाठी हैदराबाद बालाजी देवस्थान या ठिकाणीहुन साहा पुजारी आले होते. यात पंडीत दशरथ, श्रीधर आचार्य, कुंतीपरम कृष्णाचार्य, रंगाचार्य, वरदाचार्य, विजयकुमार आचार्य, भास्कराचार्य, चैतन्य महाप्रभू, अदि पुजाऱ्यांचा समावेश आहे त्यांनी बालाजी च्या मुर्तीचा दुध,दही, तुपने अभिषेक करुन होमहवन यज्ञ आशा अनेक पुज्या ज्या कि तिरुपती या ठिकाणी होतात त्याच प्रमाणे कळंब बालाजी मंदिरात केल्या मुळे जणु काही आपण तिरुपती तिरुमाला देवस्थानत आहोत कि काय असे प्रत्येक बालाजी भक्तांकडून ऐकावयास मिळाले. 11 एप्रिल रोजी कळंब शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत वेंकटरमना बालाजी भगवान च्या मूर्तीला रथावर विधीपूर्वक बसवून बालाजी मंदिर देवस्थान या ठिकाणाहून ही शोभायात्रा शहरातील मुख्य चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी चौक, होळकर चौक, अशी करत परत बालाजी मंदिर कळंब या ठिकाणी या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
या शोभायात्रा च्या मार्गात अनेक बालाजी भक्तांनी सकाळपासूनच रंग रांगोळी काढून पुष्पहाराचा वर्षाव करत या शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले पारंपारिक वाद्य वादकासहित युवक युवती, वृद्ध नागरिक, लहान मुले, तसेच महिलांचा खूप मोठ्या संख्येने सहभाग पहावयास मिळाला. तसेच महाप्रसादाच्या अगोदर व्यकंटेश भगवानाच्या मुर्ती ला गरुड गंगा म्हणजेच मांजरा नदीपात्रात चक्री स्नान घालण्यात आली नंतर सर्व भाविक भक्तांनी पोगल चा महाप्रसाद घेऊन या अभूतपूर्व ब्रह्मोत्सवाचा लाभ घेतला.
या बालाजी ब्रह्म उत्सवासाठी रवींद्रजी ओझा, विष्णुदास जाजू, ब्रिजलाल भुतडा, संजयजी मुंदडा, बालाप्रसाद करवा, शिवभाऊ काकांणी, कृष्णा सोनी, सागर करवा, सुयोग काकांणी, दिपेश भुतडा, मयुर काकांणी रामु करवा अदि बालाजी भक्तांनी परिश्रम घेतले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015