logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महात्मा ज्योतिबा फुले जयंती म्हणजे त्यांच्या विचारांना उजाळा - महेंद्र मेंढे भव्य महाप्रसाद वितरणाने सामाजिक बांधिलकी जोपासली

महात्मा ज्योतिबा फुले जयंती म्हणजे त्यांच्या विचारांना उजाळा - महेंद्र मेंढे
भव्य महाप्रसाद वितरणाने सामाजिक बांधिलकी जोपासली

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- महात्मा फुले म्हणजे हे फक्त समाजसुधारक नव्हते. तर ज्या काळात स्त्रीला अंधारात ठेवल्या जात होते त्या वेळी त्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या हातात पुस्तक दिलं कारण क्रांती घरातूनच सुरू होते. महात्मा फुले म्हणायचे, 'जर जन्मावर तुमचा स्थान ठरत असेल तर ही जाती व्यवस्था माणसासाठी नाही. ही जाती व्यवस्था फक्त अन्याय नाही तर माणसाच्या स्वाभिमानाची चोरीच आहे." त्यांनी धर्मालाच प्रश्न केला कारण धर्माच्या नावाखाली अज्ञान आणि भीती पसरवली जात होती. महात्मा फुले म्हणतात, "जो धर्म माणसाला खालच्या स्तरावर ठेवतो तो धर्म नाही तो एक सापळा आहे." त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे एक संधी नव्हती तर शिक्षण म्हणजे एक शस्त्र होतं कारण जे शिकले ते प्रश्न विचारतील आणि जे प्रश्न विचारतील ते कधीही गुलाम होणार नाही. शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये त्यांनी लिहिलं की, शेतकरी फक्त निसर्गाशी नाही तर व्यवस्थेशीही झगडतो. ज्याच्या कष्टावर सगळं उभा आहे. त्यालाच न्याय नाही. ही सर्वात मोठी विटंबना आहे. महात्मा फुले जयंती म्हणजे फक्त फुल अर्पण करणे नाही तर त्यांच्या विचारांना उजाळा देणे होय असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे यांनी केले.
ते महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन भंडाराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसरात समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाच्या माध्यमातून समानतेचा दीप प्रज्वलित करणारे थोर समाजसुधारक तथा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त भव्य महाप्रसाद वितरण व मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून परमानंद मेश्राम, नगरसेवक नितीन गायधने, नगर सेवक शिवशंकर आजबले, उपाध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, शैलेश खरोले, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, शशिकला भेदे, सुचिता नागरिकर, शैलेश मेश्राम, सुरज साखरकर, आसिफ भाई, शेखरभाई, जयदेव माहुर्ले, संजय वंजारी, विनोद चकोले, आसिफ भाई, सुरज गायधने, आकाश कटणकर, नागेश ताईतकर, जितेंद्र ढेंगे, लोकेश गाढवे, सुदेश साखरकर, प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी - कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले की जय, जय जवान जय किसान, भारतीय संविधान की जय, जय ओबीसी जय संविधान च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होते.
त्यावेळी मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चारित्र्यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करून सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास दोन हजारांच्या वर व्यापारी, शेतकरी बांधव व महिलांना वर्गांनी आलुभात व कढीचा भव्य महाप्रसाद लाभ घेतला. अशाप्रकारे नवीन पायंडा रचला आहे.
सुत्रसंचालन अनिल दिघोरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जितेंद्र ढेंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धिरज भोपे, जिवन भेदे, देशकर, मंगेश गिरेपुंजे, अनिरुद्ध कुंभलकर, जितेंद्र ढेंगे, संदीप दोनुले, शेखर फंदे, ज्ञानेश्वर सोलंकी, निखिल केवट, विनोद सार्वे, सुरेश कटणकर, गोलू गाढवे, राहुल घडिले, अक्षय ईळपाचे, अनुराधा मेश्राम, पिंकी शेलारे, कांचन खोब्रागडे, धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी सहकार्य केले. *Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment