logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झालं...पांढरी साडी, केसात फूल अन् हसरा चेहरा..कायम स्मरणात राहणार ..

Apr 12, 2026,
कोल्हापूर : ( प्रतिनिधी )
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली.
आशा ताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. आशा भोसले जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांची हजारो गाणी आणि त्यांच्या जादुई आवाज आज आपल्याबरोबर आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आशा भोसले वयाच्या 92 व्या वर्षीही तितकाच चिरतरूण होत्या. अनेक कार्यक्रमांना त्या हजेरी लावत होती. त्यांची नात जनाई कायम त्यांच्याबरोबर असायची. क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात आशा ताई शेवटचा दिसल्या होत्या. मोठ्या आनंदाने त्या लग्नात सहभागी झाल्या होत्या. नेहमीप्रमाणे सुंदर व्हाइट कलरची साडी. गळ्यात मोत्याची माळ, केसात माळलेलं मोठं फूल आणि त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आशा ताईंना मीडियासमोर हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला होता. त्यांचा हा शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

1
419 views

Comment