logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 12.4.2026 10:23 am पुण्यात पाणीकपात ? स्वयंसेवी संस्थांकडून प्रश्नांचा पूर .. मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील शुद्ध केलेले

Aima midiya jan jan ki avaj Date 12.4.2026 10:23 am पुण्यात पाणीकपात ? स्वयंसेवी संस्थांकडून प्रश्नांचा पूर ..
मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी न वापरता धरणातील पिण्याचे पाणी का वापरले जातेय, असा सवाल करत सजग नागरिक मंचाने या कपातीला तीव्र विरोध दर्शवला आहे.पुणे : यंदाच्या वर्षी पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त करत जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पंधरा टक्के पाणी कपात करण्याची नोटीस दिली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पावसाळा उशिरा सुरू झाल्यास धरणातील उपलब्ध पाण्याचे कशा पद्धतीने नियोजन करता येईल यासाठी दोन प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा एक प्रस्ताव असून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा दुसरा प्रस्ताव आणि पुरवठा विभागाने तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्ही प्रस्ताव सविस्तर माहितीसह आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे ठेवले जाणारा असून त्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. शहरात पाणी कपातीच्या सुरू झालेल्या चर्चांवर आता विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘शंभर कोटी रुपये खर्चून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे महापालिकेने उभारलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील प्रक्रिया केलेले ५० टक्के देखील पाणी जलसंपदा विभाग शेतीसाठी सोडत नाही. असे असताना जलसंपदा विभाग पुण्याचे पाणी कमी करण्याची भाषा का करत आहे? आणि, त्यांच्यासमोर महापालिका प्रशासन आणि शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी मान का खाली घालत आहेत,’ अशी विचारणा सजग नागरिक मंचाने केली.शहरातील प्रस्तावित पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. मुंढवा जॅकवेल यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरली जात नसल्याचा आरोप करून, महापालिका आयुक्तांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.

महापालिका दररोज सुमारे ६५ कोटी लिटर (६५० एमएलडी) सांडपाणी शेतीला वापरण्यासाठी योग्य होईल, अशा पातळीपर्यंत शुद्ध करते. हे पाणी शुद्ध करून बेबी कॅनॉलमार्गे दौंडपर्यंत सोडण्याची क्षमता असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जातो. मात्र, डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रत्यक्षात सरासरी २५ कोटी लिटर (२५० एमएलडी) पाणीच जलसंपदा विभागाकडून उचलले गेले असल्याची आकडेवारी वेलणकर यांनी मांडलीमहापालिकेने शुद्ध केलेल्या सांडपाण्याचा पुरेपूर वापर न करता, जलसंपदा विभागातील अधिकारी खडकवासला धरणसाखळीतून शेतीसाठी पिण्याचे पाणी आवर्तन स्वरूपात सोडत आहेत. त्या ऐवजी जलसंपदा विभागाने मुंढवा जॅकवेलमधून पूर्ण क्षमतेने सांडपाणी उचलले असते, तर गेल्या चार महिन्यांत जवळपास पावणेदोन टीएमसी पाण्याची बचत झाली असती. धरणातील किमान एक टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्याची वेळ आली नसती. हे पाणी शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी उपलब्ध राहिले असते,’ असेही त्यांनी नमूद केले.पाणीकपात टाळण्यासाठी नगरसेवक, आमदारांनी खंबीर भूमिका घ्यावी
शहरात पाणीकपात करण्याच्या निर्णयाला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. जलसंपदा विभागाच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी महापालिका प्रशासन नागरिकांवर अन्यायकारक निर्बंध लादणार असल्याचा आरोप मंचाने केला. ‘पुण्याच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री, तसेच स्थानिक आमदारांसमोर ही बाब तातडीने मांडून शहराची पाणीकपात टाळण्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी. शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता पूर्णतः वापरली गेल्यास पिण्याच्या पाण्यावरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो,’ असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.

0
0 views

Comment