logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लाडगाव आश्रमशाळेत समता सप्ताहाच्या निमित्ताने महात्मा फुले जयंती साजरी



काटोल, तालुका प्रतिनिधी- लाडगाव येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प, काटोल व आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी समता सप्ताह व महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी समतादूत मोहन पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या विचारांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसमोर समता व अंधश्रद्धेविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित नीलकंठ गजभिये, संचालक आदिवासी सेवा सहकारी संस्था लाडगाव यांनी विद्यार्थ्यांना समता व शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाला शाळेचे अधीक्षक धम्मपाल वैद्य, सारिका पांडे अधीक्षिका, शुभांगी माहुरे, वंदना सुपारे, शीला वालदे इ.माध्यमिक शिक्षिका आणि भीमराव रेवतकर, राहुल टेकाडे, रमेश गाडरे, लता बारसागडे, प्रवीण बाणेवार, दीपिका गायकवाड इ. प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैशाली राऊत, रजनी टेकाम, आकाश भोयर, अमोल टेकाम इ. शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन संदीप शेंडे, शिक्षक यांनी केले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी महोत्सव व समता सप्ताहाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दि.14 एप्रिल 2026 पर्यंत दररोज "समता पर्व" कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

समता सप्ताह या उपक्रमासाठी बार्टीच्या महासंचालक दिपाली मुधोळ मुंडे, आदिवासी विकास विभाग आयुक्त लिना बनसोड, आयुषी सिंह अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरचे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गलगट यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

20
1306 views

Comment