logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*धाराशिव मध्ये राजर्षी शाहू संस्थेकडून महात्मा फुले जयंती निमित्ताने रुग्णांना फळे वाटप..... ‌.

‌ धाराशिव , प्रतिनिधी - भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाही रे वर्गाला शि क्षणाची द्वारे उघडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ जयंती निमित्ताने आज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे गरजू रुग्णांना फळे वाटप करून महात्मा फुले यांची 199 वी जयंती आगळीवेगळी साजरी करण्यात आली. म.फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्षुद्रातिशुद्र व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यतीत केले. भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. म. फुले कर्ते समाजसुधारक होते. समतेच्या विचारावर आधारलेली पुरोगामी समाजाची निर्मिती करणाऱ्या महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने रुग्णांना फळे वाटप करून समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याचा एक सामाजिक संदेश या उपक्रमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या अध्यक्ष उज्वला शिंदे यांनी बोलताना सांगितले. या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. महापुरुषांचे सामाजिक योगदान लक्षात घेता त्यांची चळवळ नवीन पिढीमध्ये ज्ञात व्हावी, हा जनजागृतीच्या उपक्रमातून समाजामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व या संविधानाच्या विचारांची प्रेरणा निर्माण करण्याचा आमचा या कार्यक्रमातून प्रामाणिक प्रयत्न असल्याचे उज्वला शिंदे यांनी बोलताना सांगितले..* ‌ धाराशिव , प्रतिनिधी - भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाही रे वर्गाला शि क्षणाची द्वारे उघडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ जयंती निमित्ताने आज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे गरजू रुग्णांना फळे वाटप करून महात्मा फुले यांची 199 वी जयंती आगळीवेगळी साजरी करण्यात आली. म.फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्षुद्रातिशुद्र व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यतीत केले. भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. म. फुले कर्ते समाजसुधारक होते. समतेच्या विचारावर आधारलेली पुरोगामी समाजाची निर्मिती करणाऱ्या महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने रुग्णांना फळे वाटप करून समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याचा एक सामाजिक संदेश या उपक्रमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या अध्यक्ष उज्वला शिंदे यांनी बोलताना सांगितले. या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. महापुरुषांचे सामाजिक योगदान लक्षात घेता त्यांची चळवळ नवीन पिढीमध्ये ज्ञात व्हावी, हा जनजागृतीच्या उपक्रमातून समाजामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व या संविधानाच्या विचारांची प्रेरणा निर्माण करण्याचा आमचा या कार्यक्रमातून प्रामाणिक प्रयत्न असल्याचे उज्वला शिंदे यांनी बोलताना सांगितले.

15
819 views

Comment