logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*नागपूरात त्रिदिवसीय निःशुल्क योग शिबिर – नागरिकांसाठी सुवर्णसंधी*!

*नागपूरात त्रिदिवसीय निःशुल्क योग शिबिर – नागरिकांसाठी सुवर्णसंधी*!

(गजानन ढाकुलकर ) हिंगणा : ग्रामीण भागात निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले असून पतंजली योगपीठ हरिद्वार व ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११, १२ आणि १३ एप्रिल २०२६ दरम्यान त्रिदिवसीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे होणार आहे.

या विशेष शिबिरात श्रद्धेय योगऋषी स्वामी रामदेवबाबा व पूज्यनीय आचार्य बालकृष्ण यांचे परमशिष्य पूज्यनीय डॉ. परमार्थदेव महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच मा. आमदार मोहन मते व मा. महापौर निताताई ठाकरे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच.
१२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ‘गीता मंदिर’ येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील योग कार्यकर्ते, प्रशिक्षक व साधक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग प्रशिक्षकांचा सत्कारही केला जाणार आहे.

हिंगणा तालुका प्रभारी योग प्रशिक्षक चंद्रकांत वरले (गुरुजी) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनासाठी आसन, प्राणायाम व ध्यान यांचा नियमित अभ्यास अत्यावश्यक आहे. या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकाने योगतंत्र शिकून आपले जीवन निरोगी, स्वस्थ व आनंदी बनवावे.” असे आव्हान चंद्रकांत वरले ( गुरुजी) यांनी केले आहे.

“निरोगी जीवनाचा मूलमंत्र – शिकून घ्या योगतंत्र!”

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

19
712 views

Comment