क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी-एकनाथ मस्के
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी-एकनाथ मस्के
शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या जोतिबांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा एकनाथ मस्के यांचा निर्धार
माजलगाव । प्रतिनिधी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली... असा मूलमंत्र देऊन बहुजन समाज आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती सामाजिक स्तरावर उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त त्यांचे कार्य आजही समाजासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे,
असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मस्के यांनी केले आहे.
महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर जातीभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध प्रखर लढा दिला. देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.
शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा विधवांचे दुःख, प्रत्येक ठिकाणी जोतिबांनी आपल्या कार्यातून क्रांती घडवून
आणली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी माणसाला गुलामगिरीतून मुक्त करून आत्मसन्मानाने जगण्याची शिकवण दिली.
आजच्या आधुनिक काळातही महात्मा फुले यांचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि समाजात शैक्षणिक व सामाजिक प्रगती साधणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहनही एकनाथ मस्के यांनी यावेळी केले आहे.