
गॅस दरवाढीच्या विरोधात मुल कांग्रेसचे धरणे व निदर्शने
चंद्रपूर। भारत देशावर अधिराज्य करीत असलेल्या भाजप प्रणित केंद्र सरकारने स्वयंपाक करणाऱ्या गॅस डिलेंडरचे दुप्पटीने भाव वाढ केल्याने देशातीलच गरीब व सर्वसाधारण कुटुंबियांचे कंबरडे मोडले असून केंद्र शासनाचे नेतृत्व करीत असलेल्या मोदींचा प्रत्येक घरात व गॅस एजन्सी समोर शेतकऱ्यांचे कल्याण, बेरोजगारांना रोजगार, वाढत्या महागाईचा विरोध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे युवा नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य संकल्प दिन म्हणून मुल तालुका व शहर कांग्रेस कमिटीच्या वतीने संजय गॅस एजन्सी समोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
मुल येथे चांद्रपूरजिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात गॅस एजन्सी समोर करण्यात आलेल्या निषेध व धरणे आंदोलनात मोदी सरकार हाय-हाय, वारे मोदी तेरा खेल-सस्ती दारू महेंगा तेल" मोदींच्या राज्यात-महिला गॅस असून काड्यासाठी जंगलात"
असे महिलांनी नारे देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजने अंतर्गत गरीब व आदिवादी बांधवांच्या प्रत्येक घरी गॅस दिली असून मोदी सरकारच्याच कार्यकाळात गॅसची किंमत 350/- वरुन 830/ ते-900/- अशी भाववाढ केली आहे. तशीच 232 /-रुपये मिळणारी सबसिडी फक्त 36/- केली. त्यामुळे महिलांना गॅस घेणे कठीण झाले असून प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक बजेट डबघाईस आले. ग्रामीण भागातील उज्वला गॅस घेणाऱ्या गरीब महिलांजवळ सिलेंडर भरण्यासाठी 830/- रुपये नसल्याने स्वयंपाक कसे करावे या विवनचनेत सापडल्याने शेवटी इंधन म्हणून काड्या आणण्यासाठी जंगलात जाणे भाग पडले आणि वाघाच्या हल्ल्यात बिचाऱ्या अनेक महिला मारल्या गेल्या यालाही केंद्र सरकार जबाबदार असल्याने प्रत्येक महिलांकडून निषेध करण्यात येत असल्याचे संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वात आंदोलनात सहभागी महिला ममता रावत, नगर सेविका लीना फुलझेले, महिला कांग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, सौ. सिंगाडे, क्रीशना सुरमवार, यांचेसह कांग्रेसच्या महिला कार्यकर्त्या,तसेच तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भेजगावचे सरपंच व बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, किसान सेलचे तालुका अध्यक्ष रुमदेव गोहणे, ग्रामीण कांग्रेसचे प्रमुख दीपक पा. वाढई, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, शहर कांग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, महासचिव कैलास चलाख,संघटक, कोसंबी सरपंच रवी गिरडकर, गणेश रणदिवे, रणजित आकुलवार,कमलशिंह पटवा, सोनोशिंग पठवा, यांचेसह अनेक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.