logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

काटोल तालुक्यातील कोळंबी येथे सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन घराघरात संविधान उद्देशिका वाटपाचा उपक्रम उत्साहात साजरा......


काटोल प्रतिनिधी -दि. ८ एप्रिल २०२६ :
शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’चे उद्घाटन काटोल तालुक्यातील कोळंबी येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त सुकेशीनी तेलगोटे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड व प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानगाव ग्राम पंचायतच्या सरपंच कमलाताई परतेती होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार निळकंठ गजभिये, तालुका समतादूत मोहन पांडे, ग्राम पंचायत सचिव एम. एम. करेवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलजी नारनवरे, पोलीस पाटील कमलदास निस्वादे, प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका लिखार मॅडम व राऊत मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर घोरपडे यांनी केले. प्रमुख पाहुणे मोहन पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत संविधानाचे महत्त्व विशद केले. सरपंच कमलाताई परतेती यांनी महिलांना मिळालेल्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. पत्रकार निळकंठ गजभिये यांनी सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य निताताई मोहरिया, गीताताई घोरपडे, मनीषा आहाके, समता सैनिक दलाच्या संजीवनी घोरपडे, मीना निस्वादे, पौर्णिमा घोरपडे, साधना घोरपडे, रेश्मा निस्वादे, माजी सरपंच तेजरामजी वंजारी, नामदेवराव घोरपडे, दीपक घोरपडे, देविदास घोरपडे, किशोर घोरपडे, प्रकाश निस्वादे, राजेंद्र इंगोले, अनिल वंजारी, कमलभाऊ मोहरिया, आनंद वंजारी, भूषण परतेती, गजानन लोणारे, विनोद लोणारे, मंगेश निस्वादे, विशाल नागदेवे, बालकदास घोरपडे यांच्यासह इतर ग्रामस्थ व प्रा. शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले तसेच ‘घराघरात संविधान उद्देशिका’ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश मोहरिया यांनी मानले.

306
9952 views

Comment