logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

“जल, जंगल, जमीन, शिक्षण, न्याय, हक्क-अधिकार व संस्कृती रक्षणासाठी आदिवासी टायगर सेनेचा निर्धार”

आदिवासी टायगर सेना विदर्भ स्तरीय बैठक कुवारा भिवसन भिमगड येथे पार पडली.

प्रतिनिधी / आकाश गेडाम

कुवारा भिवसन देवस्थान, भीमगड (ता. पारशिवनी, जि. नागपूर) येथे बुधवार, दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी आदिवासी टायगर सेना यांच्या वतीने विदर्भस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीसंदर्भात विविध सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. “जल, जंगल, जमीन, शिक्षण, न्याय, हक्क व अधिकार” या प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. तसेच गाव तिथे शाखा सुरू करण्याचा निर्णयही एकमुखाने मंजूर करण्यात आला.
याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसीय राज्य अधिवेशन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला. या अधिवेशनाद्वारे संघटनेचा विस्तार व सामाजिक चळवळ अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या बैठकीस विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, विदर्भ कार्याध्यक्ष माधुरी मडावी व मीनलताई आत्राम, महासचिव साईनाथ कोडापे, प्रवक्त्या मोरेश्वर उईके, उपाध्यक्ष रमेश धुर्वे, प्रकाश कूमरे, वर्षा परचाके, तसेच संघटक नरेंद्र टेकाम, दशरथ कुलमेथे, शर्मिला कुंजाम, वर्षा आत्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत विदर्भातील सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत संघटनेच्या भविष्यातील कार्याला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

19
10430 views

Comment